Russia-Ukraine युद्ध : रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला, झेलेन्स्कींकडून संयुक्त राष्ट्रांकडे मदतीची मागणी

24 Sep 2025 20:02:56
 
Russia Ukraine War
 Image Source:(Internet)
कीव/न्यूयॉर्क :
रशिया युक्रेन (Russia Ukraine) युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून रशियाने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवला आहे. रशियाने मॉस्कोकडे जाणारे तब्बल 40 हून अधिक युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे, युक्रेनने म्हटले आहे की रशियन क्षेपणास्त्र, ड्रोन आणि बॉम्बहल्ल्यांत किमान दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
 
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. तीन वर्षांहून अधिक काळ रशियन आक्रमणाचा सामना करणाऱ्या युक्रेनियन सैन्याची परिस्थिती अजूनही कठीणच आहे.
 
झेलेन्स्की या आठवड्यात अमेरिकेसह विविध जागतिक नेत्यांशी भेट घेत आहेत. मात्र अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचे प्रयत्न थांबवले आहेत. पुतिन आणि ट्रम्प यांची अलास्कामध्ये भेट झाल्याची माहिती आहे, तर व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चाही झाली. तरीसुद्धा युद्ध सुरूच आहे.
 
झेलेन्स्की यांनी सांगितले की त्यांनी न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांचे विशेष दूत कीथ केलॉग यांची भेट घेतली. या चर्चेत अमेरिकन शस्त्रास्त्र खरेदी आणि ड्रोन निर्मितीत सहकार्य या विषयांवर चर्चा झाली. झेलेन्स्कींच्या मते, या सहकार्यामुळे युक्रेनला रशियाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाचे तांत्रिक बळ मिळू शकते.
Powered By Sangraha 9.0