जनधन खातेदारांसाठी इशारा; ३० सप्टेंबरपूर्वी Re-KYC न केल्यास खाते होईल फ्रिज!

    24-Sep-2025
Total Views |
 
Jan Dhan account
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
प्रधानमंत्री जनधन योजना (Jan Dhan Account) सुरू होऊन यावर्षी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत 10 वर्षे जुनी झालेली खाती Re-KYCशिवाय चालू ठेवता येणार नाहीत. जर ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण केली नाही तर खाते तात्पुरते बंद होईल आणि पैशांची ये-जा तसेच सरकारी अनुदान मिळणे थांबेल.
 
Re-KYC म्हणजे काय?
बँक खात्यातील आधी दिलेली माहिती पुन्हा एकदा अद्ययावत करणे म्हणजे Re-KYC.
यामध्ये खातेदाराचा पत्ता, मोबाईल क्रमांक, नाव व फोटो तपासले जातात.
आवश्यक कागदपत्रांमध्ये फक्त आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा एवढीच कागदपत्रे पुरेशी आहेत.
यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केली आहेत.
 
का आवश्यक आहे Re-KYC?
सुमारे 10 कोटी जनधन खाती आता 10 वर्षांची पूर्ण झाली आहेत.
चुकीची माहिती दुरुस्त करणे आणि खात्याचा गैरवापर टाळणे यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
 
जनधन योजनेतील सुविधा :
शून्य बॅलन्सवर खाते उघडण्याची मुभा.
खात्यातील ठेवींवर व्याजाची सोय.
१ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा, तर ३० हजार रुपयांचा जीवन विमा.
खाते चालू ठेवले तर ५ हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा.
थेट पेन्शन व सरकारी योजनांचा लाभ खात्यात.
दरम्यान त्यामुळे खातेधारकांनी ३० सप्टेंबरपूर्वी Re-KYC करून खाते सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.