Image Source:(Internet)
मुंबई:
सोमवार, २२ सप्टेंबरपासून बुधवार, १ ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्र (Sharad Navratri) साजरे होत आहेत. यंदा तृतीया तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्रोत्सव दहा दिवसांचा झाला आहे. आश्विन महिन्यात येणारा हा उत्सव पृथ्वीवरील निर्मितीशक्तीला वंदन करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण मानला जातो.
नऊ दिवसांची पूजा का?
नऊ हा अंक ब्रह्मसंख्येचा प्रतिनिधी असून, निर्मितीशक्तीशी त्याचा अतूट संबंध आहे. अंक ९ हा सर्वात मोठा अंक असून, नऊ दिवसांनंतर बियाण्यात अंकुर फुटतो; गर्भधारणेनंतर नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्मते. या कारणास्तव आदिशक्तीची पूजा नऊ दिवस केली जाते.
स्थापना आणि पूजा परंपरा
घरात पवित्र जागी मंडप उभारून, सिंहारूढ अष्टभुजा देवीची मूर्ती किंवा नवार्ण यंत्राची स्थापना करून पूजेमुळे व्रतधारी व्यक्ती नऊ दिवस उपवास करतो. सप्तशतीचा पाठ केला जातो.
महत्त्वाचे दिवस आणि विधी
शुक्रवार, २६ सप्टेंबर (ललिता पंचमी): ललिता देवीची पूजा, गंधाक्षत युक्त ४८ दूर्वा अर्पण.
सोमवार, २९ सप्टेंबर (श्रीमहालक्ष्मी पूजन): रात्री जागरण व सरस्वती आवाहन.
मंगळवार, ३० सप्टेंबर (दुर्गाष्टमी/महाअष्टमी): महाअष्टमी उपवास, श्रीसरस्वती पूजन. संधीकाळी ५.४१ ते ६.२९ पूजन.
बुधवार, १ ऑक्टोबर (महानवमी): उपवास व नवरात्रोत्थापन.
गुरुवार, २ ऑक्टोबर (विजयादशमी): सायंकाळी ९.१२ नंतर सरस्वती विसर्जन.
सणाच्या काळात आजी, आई, पत्नी, बहीण, सून, कन्या, नात या रूपात देवी घरात वावरतात आणि त्यांच्याकडे योग्य लक्ष दिले पाहिजे.
नवदुर्गेची रूपे
१. शैलपुत्री
२. ब्रह्मचारिणी
३. चंद्रघंटा
४. कुष्मांडा
५. स्कंदमाता
६. कात्यायनी
७. कालरात्री
८. महागौरी
९. सिद्धिदात्री
दरम्यान या काळात भक्त श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती आणि श्रीमहाकाली यांचीही उपासना करतात.