'माणुसकी उरली आहे का?जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकरांवर थेट संतापले

22 Sep 2025 21:04:35
 
Jitendra Awhad Gopichand Padalkar
 Image Source:(Internet)
सांगली :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. पडळकरांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह आणि कौटुंबिक टीका केली होती, ज्यावरून राजकीय वाद पेटला आहे.
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आई-वडिलांबाबत बोलणे ही काही मर्यादा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेम्स लेणे यांनी आईंबाबत लिहिले, त्यावेळी महाराष्ट्र पेटला होता. आजही अशीच परिस्थिती वाटते. या प्रकारात कुठला सुसंस्कृतपणा आहे?”
 
त्यांनी पडळकरांच्या वक्तव्याला 'मानसिकतेचा प्रश्न' म्हणत प्रश्न उपस्थित केला की, “माणुसकी उरली आहे का?” तसेच त्यांनी सांगितले की, पडळकरांनी त्यांच्या जुन्या वादाचा संदर्भ देत विधानसभेत 'मंगळसूत्र चोर' म्हणून ओरडले, परंतु ते त्यांच्या विरोधात नव्हते.
 
जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांकडून पडळकर वाडीच्या आजीच्या १८ एकर जागेबाबत स्पष्टता मागितली, “ती जागा परत दिली का?” असा प्रश्नही उपस्थित केला.
 
गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेत म्हटले होते की, “जयंत पाटील तुझ्यासारखा भिकारी अवलाद नाही, माझ्यात कार्यक्रम करण्याची धमक आहे. जयंत पाटील बिनडोक आहेत आणि त्यांना अक्कल नाही. ते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे औलाद आहेत असे वाटत नाही,” अशी टीका त्यांनी केली होती.
 
राजकारणात पुन्हा एकदा या प्रकाराने वाद पेटवला असून, राजकीय नेते आणि पक्षांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0