Image Source:(Internet)
मुंबई :
फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ (Chhawa) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या सिनेमात विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत होते. पण दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकताच या चित्रपटाबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
लल्लंटॉपशी बोलताना अनुराग कश्यपने सांगितले की, “‘छावा’ मला फारसा आवडला नाही. मला तो चित्रपट हॉलिवूडच्या ‘द पॅशन ऑफ द प्रिस्ट’सारखा वाटला. एखाद्याला यातना देऊन जे घडत होते, ते पाहणे मला कठीण झाले.”
अनुराग पुढे म्हणाले की, “मी एकतर आता हिंदी चित्रपट फारसे पाहत नाही. ‘चमकीला’, ‘धडक 2’, ‘लापता लेडीज’ हे काही मोजकेच चित्रपट पाहिले आहेत.”
‘छावा’ सिनेमाविषयी त्यांनी असेही सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर मी काही चर्चित दृश्य पाहिले. विकी आणि विनीतचे शेवटचे दृश्य पाहिले, पण कहाणी सांगण्याची पद्धत मला समजली नाही. इतरांना कदाचित ते आवडले असेल, पण माझ्या मते नाही.अनुराग कश्यपचे हे वक्तव्य चित्रपटप्रेमींमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.