त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर अमानुष हल्ला; फडणवीसांनी त्वरित कारवाईचे आदेश

20 Sep 2025 20:39:32
 
attack on journalists in Trimbakeshwar
 Image Source;(Internet)
नाशिक :
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे चार ते पाच पत्रकारांवर अमानुष मारहाणीची घटना घडली. काही पत्रकार जखमी झाले असून, या घटनेने सर्व पत्रकार समाजाला हादरवले आहे.
 
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दोषींना ताब्यात घेण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना दिली.
 
यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजन जखमी पत्रकारांना भेटून त्यांची प्रकृती विचारपूस केली. तसेच, घटनेच्या तात्काळ नोंदीसाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. फडणवीसांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या सुटकेला जागा न देता कडक कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
 
या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी प्रशासनाला तत्पर राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.
Powered By Sangraha 9.0