शिवसेनेच्या नादाला लागू पडू नका;संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा

    18-Sep-2025
Total Views |
 
Sanjay Raut CM Fadnavis
 Image Source;(Internet)
मुंबई :
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईतील बेस्ट डेपोंच्या जमिनींबाबत भाजपवर थेट आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, फडणवीसांच्या लाडक्या बिल्डर्समार्फत जमिनींचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि भविष्यात बेस्टला तोट्यात आणून बंद पाडण्याचा डाव रचला जात आहे.
 
बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे एकत्र येऊनही पराभव पत्करावा लागल्याचे राऊतांनी सांगितले. त्याचबरोबर, एका मतासाठी ५,००० रुपये, १८०० अवैध मतं आणि १,००० अपक्ष मतं भाजपच्या माध्यमातून विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
 
राऊत म्हणाले, “मास्टर फडणवीस, शिवसेनेच्या नादाला लागू पडू नका. आम्हाला तुमचे सर्व कारस्थान माहिती आहे.तसेच मुंबईत “बिल्डर राज्य” सुरू असल्याचा आणि बिल्डर्सना संधी देण्यासाठी बेस्टवर नियंत्रण मिळवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला.