शबरीमाला मंदिरातील करोडो रुपयांचे सोने गायब; न्यायालयाने दिला सखोल तपासाचा आदेश

18 Sep 2025 21:06:57
 
Sabarimala temple
 Image Source;(Internet)
कोचीन:
केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला (Sabarimala) मंदिरातील सोने रहस्यमय परिस्थितीत गायब झाल्याचे समोर आले आहे. हे मंदिर देशभरातील भक्तांसाठी महत्त्वाचे ठिकाण असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळेच या घटनामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
 
42 किलो सोन्यापैकी 4.45 किलो गायब-
२०१९ मध्ये गर्भगृहातील सोन्याच्या प्लेट्सवर गोल्ड प्लेटिंग (मुलामा देणे) करण्यासाठी मंदिरातून सुमारे 42 किलो सोने नेले गेले होते. नियोजनानुसार मुलामा तयार केल्यानंतर प्लेट्स परत गर्भगृहात ठेवण्यात आल्या. मात्र वजन मोजल्यानंतर फक्त 38 किलोच सोने वापरले गेले असल्याचे आढळले. उरलेले 4.45 किलो सोने कोणत्या परिस्थितीत गायब झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
न्यायालयाचा आदेश-
उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपासासाठी आदेश दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, शबरीमाला मंदिराशी संबंधित श्रद्धा आणि आस्था यांच्याशी तडजोड होऊ नये. गायब झालेले सोने शोधण्यासाठी त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने पूर्ण सहकार्य करावे, असेही निर्देश दिले आहेत.
 
पुढील पावले-
न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिरातील द्वारपालांच्या मूर्तींची, तसेच मूर्तींच्या रचनेची तपासणी केली जाणार आहे. या तपासातून गायब सोने कुठे गेले याबाबत अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0