(Image Source-Internet)
नवी दिल्ली:
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज ७५ वा वाढदिवस असून, देश-विदेशातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवसाच्या दिवशी मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील कार्यक्रमात बोलताना मोदींनी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली.
मोदी म्हणाले, "पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केला. आमच्या वीर जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवादी ठिकाणे उद्धवस्थ केली आणि पाकिस्तानला मान टेकवले. हा नवीन भारत आहे, जो कोणत्याही परमाणू धमकीस घाबरत नाही."
पुढे त्यांनी सांगितले, "हा नवीन भारत आहे…घराबाहेर असो किंवा घरात, आपल्या जवानांची हिम्मत आणि देशाची सुरक्षा सर्वोच्च आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि इतर स्वातंत्र्यलढ्यांनी आपल्याला प्रेरणा दिली आहे. भारताच्या गौरवापेक्षा काहीही मोठे नाही."
मोदी यांनी विकसित भारत या संकल्पनेचा उद्देशही स्पष्ट केला. “या यात्रेचे चार स्तंभ आहेत – नारी शक्ती, युवा शक्ती, गरीब आणि शेतकरी. धारमधील कार्यक्रम संपूर्ण देशासाठी आहे, विशेषतः मातांसाठी आणि भगिनींसाठी.”
पंतप्रधानांनी महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत सांगितले, “निरोगी महिला म्हणजे मजबूत कुटुंब. सरकारी तिजोरी पेक्षा तुमचे आरोग्य महत्त्वाचे. चाचण्या आणि औषधे मोफत दिली जातील. मातांना स्वतःसाठी वेळ देण्याचे आवाहन आहे.”