(Image Source-Internet)
नागपूर:
टाटा संसचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांनी आज नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीजच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादन केंद्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गोळा-बारुद, क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षण उत्पादने कशी तयार केली जात आहेत याची पाहणी केली.
माध्यमांशी बोलताना एन. चंद्रशेखरन म्हणाले, “रक्षण क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात अनेक कंपन्यांची गरज आहे. देशाच्या संरक्षणाची आवश्यकता फक्त एकट्याने पूर्ण करता येणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी आपापले योगदान द्यावे लागेल. जिथे सहयोगाची संधी असेल, तिथे आम्ही सहकार्य करू. आजचा दौरा फक्त सुविधाकेंद्र पाहण्याचा आणि कामकाज समजून घेण्याचा होता. भविष्यकाळात या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.”
यावेळी सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल म्हणाले, “भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही, पण आजचे भेट फक्त शिष्टाचारासाठी होते. दोन दिवसांपूर्वी कलेक्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की श्री. चंद्रशेखरन येऊ इच्छित आहेत. आमच्यासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे. भारतातील संरक्षण गरजा आणि क्षमता या क्षेत्रात मोठी संधी आहे.”
नागपूरच्या उद्योग क्षेत्रात संरक्षण उद्योगातील ही भेट, भविष्यातील सहकार्य आणि संधींचा संदेश ठरू शकते.