(Image Source-Internet)
मुंबई:
मेघालयच्या (Meghalaya) राजकारणात सध्या धक्कादायक घडामोडी सुरु आहेत. सत्तेत असलेल्या युतीतील अनेक मंत्र्यांनी अचानक राजीनामे दिल्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ही घटना गेल्या 11 वर्षांत पहिल्यांदा दिसत आहे.
सत्तेत कोणती हलचाल?
मेघालयमध्ये सत्ताधारी युतीतील 12 मंत्र्यांपैकी 8 ने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी), युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (यूडीपी), हिल स्टेट डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी) आणि भाजपचे मंत्र्यांचा समावेश आहे.
राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये एनपीपीचे अम्पारीन लिंगदोह, कॉमिंगोन यम्बोन, रक्कम ए. संगमा; यूडीपीचे अबू ताहीर मंडल, पॉल लिंगदोह, किरमेन शायला; एचएसपीडीपीचे शकलियार वारजरी आणि भाजपचे के ए एल हेक यांचा समावेश आहे.
राजीनाम्याचे कारण-
मेघालयमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. युतीतील सर्व पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच नव्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी, यासाठी ही हलचाल केली जात आहे. या राजीनाम्यांमुळे जागा रिक्त झालेल्या मंत्र्यांचे खाते नवीन नेत्यांकडे हस्तांतरित केले जाईल.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी सत्तेत मोठा बदल-
कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपी सरकारमध्ये एकूण 12 मंत्री होते. 2023 च्या निवडणुकीनंतर तयार झालेल्या मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्समध्ये अनेक पक्षांचा समावेश आहे. आता 8 मंत्र्यांच्या राजीनाम्यांमुळे मंत्रिमंडळ विस्तारासाठी मार्ग मोकळा झाला आहे.