महाराष्ट्रात सरकारी भरती प्रक्रियेत मोठा निर्णय; गट-ब, गट-क पदांची जबाबदारी एमपीएससीकडे

15 Sep 2025 16:40:59
 
MPSC
 (Image Source-Internet)
नागपूर :
राज्यातील सरकारी नोकरीच्या भरतीत वारंवार निर्माण होणारे वाद, गैरव्यवहार आणि अनियमिततेमुळे सरकारने आता नवा मार्ग अवलंबला आहे. गट-ब आणि गट-क संवर्गातील सर्व पदांसाठीच्या परीक्षा थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
यापूर्वी या परीक्षा महापरीक्षा पोर्टल आणि विविध खाजगी संस्थांकडून पार पडत होत्या. मात्र, अनेक तांत्रिक अडचणी, बनावट उमेदवारांचा सहभाग आणि निकालांबाबतच्या शंका यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे शासनाने आता सर्व परीक्षा एमपीएससीच्या अखत्यारीत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सरकारच्या या पावलामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0