राहुल गांधींवर भाजप महिला मोर्चाचा संताप; विरारमध्ये काँग्रेसविरोधात जोरदार आंदोलन

15 Sep 2025 17:35:26
 
Rahul Gandhi
 (Image Source-Internet)
विरार :
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून वसई-विरारमध्ये भाजप महिला मोर्चाने तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “मातृशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही” असा जोरदार घोष केला.
 
रविवारी अचोले पोलिस ठाण्यासमोर भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर असभ्य, अमानवी राजकारण केल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केला. प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींविषयी काँग्रेसकडून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टचा महिला मोर्चाने तीव्र शब्दांत निषेध केला. या निदर्शनात नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन नाईक देखील सहभागी झाले होते. त्यांनी ठामपणे सांगितले की, “राहुल गांधी आणि काँग्रेसने मातृशक्तीचा अपमान करून देशातील कोट्यवधी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. अशा नेत्यांना जनता कधीच माफ करणार नाही.” काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांचा संताप अधिकच भडकला असून आगामी काळात विरोध आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0