आता ४५ दिवसांत मिळणार कुणबी प्रमाणपत्र; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

12 Sep 2025 15:02:05
 
Kunbi
 (Image Source-Internet)
मुंबई :
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार पात्र नागरिकांना कुणबी (Kunbi) मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी २१ ते ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
 
प्रमाणपत्रासाठी लागणारा वेळ-
अर्ज सादर झाल्यानंतर विविध स्तरांवर तपासणी, पडताळणी आणि ग्रामस्तरीय समितीचा अहवाल घेण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे कीमान ३ आठवडे ते कमाल दीड महिना इतका कालावधी ठरवण्यात आला आहे.
 
कोणती कागदपत्रं लागतील?
पूर्वजांच्या महसुली नोंदीतील जातीचा पुरावा
नातेवाईकांचा जातीसंबंधी दाखला (उपलब्ध असल्यास)
वंशावळ व शपथपत्र
शिंदे समितीने शोधलेल्या नोंदींचा आधार
शाळा सोडल्याचा दाखला (TC) व पूरक कागदपत्रं
 
अर्ज कसा करायचा?
महा-ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करावा.
अर्ज तहसील कार्यालयात पोहोचेल, तेथे छाननी केली जाईल.
त्रुटी आढळल्यास अर्जदाराला दुरुस्तीची सूचना दिली जाईल.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज ग्रामसमितीकडे पाठवला जाईल.
ग्रामस्तरीय अहवाल मिळाल्यावर अर्ज उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी जाईल.
अंतिम प्रमाणपत्र कोणाकडून मिळेल?
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने अधिकृत कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0