Gen-Z पिढी आणि हृदयविकाराचा धोका; WHO चा इशारा, बचावाचे उपाय

12 Sep 2025 17:04:14
 
heart disease WHO warning
  (Image Source-Internet)
नागपूर:
जागतिक आरोग्य संघटना (WHO) सतत अधोरेखित करत आहे की, जगभरातील मृत्यूंचं सर्वात मोठं कारण म्हणजे हृदयरोग. दरवर्षी लाखो लोक हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे जीव गमावत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, याचा फटका आता तरुणांनाही बसतो आहे. विशेषतः Gen-Z पिढी (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेले) हृदयविकाराच्या जोखमीला अधिकाधिक सामोरे जात असल्याचे ताज्या अहवालात दिसून आले आहे.
 
WHO चे निष्कर्ष-
दरवर्षी अंदाजे १.८ कोटी लोकांचा मृत्यू हृदयरोगांमुळे होतो.
यातील ८०% मृत्यू हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे होतात.
जवळपास तृतीयांश मृत्यू ७० वर्षांखालील लोकांमध्ये होत आहेत.
अस्वास्थ्यकर आहार, व्यायामाचा अभाव, तंबाखू, मद्यपान आणि प्रदूषण हे मुख्य कारणे मानली जातात.
तरुणांमध्ये का वाढतोय धोका?
पूर्वी हृदयविकार वयानुसार वाढणारी समस्या मानली जायची, पण आता चित्र बदलले आहे. अभ्यासानुसार,
२०१९ मध्ये १८ ते ४४ वयोगटातील हृदयविकाराचा धोका ०.३% होता,
तर २०२३ मध्ये तो ०.५% पर्यंत गेला आहे.
 
यामागील मुख्य कारणे:
 
प्रोसेस्ड फूड आणि फास्ट फूडचे वाढते सेवन
बसून राहण्याची सवय (sedentary lifestyle)
धूम्रपान व ई-सिगारेटचे व्यसन
जास्त प्रमाणात स्क्रीन टाइम आणि तणाव
हार्ट अटॅकची आधी दिसणारी लक्षणे
छातीत दडपण किंवा वेदना
महिलांमध्ये मान, खांदा किंवा हातात दुखणे
अॅसिडिटीसारखी जळजळ
डाव्या हातात वेदना
जबड्यात/पाठीत वेदना
श्वास घेण्यास त्रास, पोटात दुखणे
चक्कर, घाम
 
Gen-Z स्वतःला कसे वाचवू शकतात?
तज्ज्ञ आणि American Heart Association (AHA) यांचे मार्गदर्शनानुसार :
१. आहारात बदल
भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, प्रोटीनयुक्त पदार्थ खा.
जास्त मीठ, साखर आणि तेलकट पदार्थ टाळा.
फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्स मर्यादित करा.
२. नियमित व्यायाम
दररोज ३०-६० मिनिटे चालणे, धावणे, सायकलिंग किंवा योगा करा.
स्क्रीन टाइम कमी करून शारीरिक सक्रियता वाढवा.
३. तंबाखू व व्हेपिंगपासून दूर रहा
धूम्रपान आणि ई-सिगारेटचा वापर पूर्णपणे थांबवा.
यामुळे हृदयरोगाचा धोका अर्ध्याने कमी होतो.
४. वजन व आरोग्य नियंत्रणात ठेवा
BMI १८.५ ते २४.९ दरम्यान ठेवा.
नियमित आरोग्य तपासण्या करून रक्तदाब, साखर आणि कोलेस्टेरॉल तपासा.
५. तणाव व्यवस्थापन
ध्यान, योगा, पुरेशी झोप (७-९ तास) घ्या.
सोशल मीडियावरून वेळोवेळी ब्रेक घ्या.
६. मद्यपान मर्यादित करा
अतिमद्यपान हृदयासाठी घातक आहे. शक्यतो पूर्णपणे टाळा.
 
निष्कर्ष-
लहान वयातच योग्य जीवनशैली अवलंबली, तर ८०% हृदयरोग टाळता येऊ शकतात. छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा अनियमित लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 
Gen-Z पिढीला जर खरंच स्वस्थ आणि दीर्घायुषी जीवन हवं असेल, तर डिजिटल आणि फास्ट-फूड संस्कृतीवर ब्रेक लावून व्यायाम, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्य यावर गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0