महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित;नेपाळमधील असंतोषावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

11 Sep 2025 18:08:23
 
Tourists in Maharashtra are safe in nepal says cm Fadnavis
 (Image Source-Internet)
मुंबई :
नेपाळमधील (Nepal) असंतोषाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "ही आंतरराष्ट्रीय बाब आहे, त्यामुळे यावर भारत सरकार बोललेले अधिक योग्य ठरेल. नेपाळमध्ये गेलेले आमचे पर्यटक, त्यात महाराष्ट्रातीलही नागरिक आहेत, त्यांना सुरक्षित परत आणले जात आहे. त्यांच्याशी आमचा सातत्याने संपर्क सुरू आहे."
 
नेपाळमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र महाराष्ट्र सरकारकडून खात्री देण्यात आली आहे की राज्यातील सर्व पर्यटक सुरक्षित आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0