(Image Source-Internet)
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सरकारकडून नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत, पण त्या राबवण्यासाठी आवश्यक निधीच उपलब्ध नाही. फक्त घोषणांवर आणि टॅगलाईनवर सरकार चालवले जात आहे,” अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली.
सुळे म्हणाल्या, “सिंदूर ही फक्त एक टॅगलाईन नाही, तर ती अतिशय भावनिक गोष्ट आहे. पहलगाममधील पीडितांचे दु:ख, त्यांचा आक्रोश याचा विचार करा. सरकारने संवेदनशीलतेने या प्रश्नांकडे पाहायला हवे.”
त्यांनी पुढे सरकारच्या अर्थव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सरकारच्या इकॉनॉमी सिस्टीममध्येच त्रुटी आहेत. योजना तर आणल्या जातात, पण त्यांना पाठबळ देण्यासाठी खजिन्यात पैसे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जाते,” असा थेट आरोप सुळे यांनी केला.
राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली असून, विरोधकांनी यावर सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.