नागपुरात रिलायन्स उभारणार भव्य फूड पार्क तर अदानी समूह ७० हजार कोटींची करणार गुंतवणूक!

    11-Sep-2025
Total Views |
 
Reliance Adani Group
 (Image Source-Internet)
नागपूर:
विदर्भ आणि विशेषतः नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अडानी (Adani) समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी विदर्भात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, अडानी समूह विदर्भात तब्बल ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, या प्रकल्पामुळे नागपूरसह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
रिलायन्स इंडस्ट्रीजने नागपूर जिल्ह्याच्या काटोलमध्ये १,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत फूड पार्क उभारण्याची योजना जाहीर केली आहे. या फूड पार्कमुळे नागपूरच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल, कारण शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजार मिळेल.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या गुंतवणुकीमुळे नागपूरसह विदर्भात औद्योगिक वातावरण मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.