नागपूरजवळील ओयो हॉटेलवर धाड; सेक्स रॅकेट उघडकीस

10 Sep 2025 22:34:17
 
Sex racket exposed
 (Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर (Nagpur) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) "ऑपरेशन शक्ती" अंतर्गत भिलगाव परिसरात मोठी कारवाई केली. ९ सप्टेंबर रोजी एम.आर. ओयो हॉटेलवर धाड टाकून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.
 
भिलगावमधील जायसवाल बार चौकाजवळील घर क्रमांक ४०, वार्ड क्रमांक २ येथील या हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी मनीषपाल सुधर्शन राजपूत (४९) व त्यांची पत्नी सिमरानी राजपूत (५०) यांना अटक केली. त्यांच्यासोबतच सोनू उर्फ सय्यद अली याचाही या अवैध धंद्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
 
कारवाईदरम्यान पोलिसांनी एक पीडित महिला वाचवली. तसेच १,५०० रुपये रोख, चार मोबाईल फोन, डीव्हीआरसह एकूण १.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
या प्रकरणी यशोधरानगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अनैतिक मानव व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0