(Image Source-Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन हायकोर्टात गाजलं. या सुनावणीत वकील गुणरत्न सदावर्ते (Sadavarte) यांनी आंदोलनाविरोधात ठोस मुद्दे मांडले.
सदावर्ते म्हणाले की, आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरातील रुग्णालयं, शाळा-महाविद्यालयं आणि वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरतात, रस्ते अडवतात, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतेय.
त्यांनी थेट राजकीय पक्षांवरही आरोप केला. "शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आंदोलकांना मदत केली जाते," असा आरोप त्यांनी केला. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ला, महिला पत्रकारांची छेडछाड झाल्याचंही त्यांनी न्यायालयात सांगितलं.
याशिवाय सदावर्तेंनी आंदोलनाची तुलना दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनाशी करत, यामागे कोण फंडिंग करतंय याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. आता हायकोर्ट या प्रकरणी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.