(Image Source-Internet)
नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेत शासकीय कंत्राटदार पीव्ही वर्मा यांनी गळ्याला दोर लावून आत्महत्या केली आहे. माहिती नुसार, वर्धा जिल्ह्यातील एमआयडी देवळी येथे काम सुरु असताना त्यांचे जवळपास ३० कोटी रुपये थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होते. आर्थिक तंगीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
नागपूरच्या राजनगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. पोलीस सध्या प्रकरणाची अधिक तपासणी करत आहेत, मात्र परिसरात या घटनेमुळे मोठा खळबळ उडाली आहे.
राज्यभरात कंत्राटदारांचे ९० हजार कोटी रुपये थकीत बिल असल्याचेही राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष एम. सरोदे यांनी सांगितले. त्यांनी या दुर्दैवी घटनेसंदर्भात शासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.