नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये टाकलेल्या धाडीत दोन महिलांची सुटका

    07-Aug-2025
Total Views |
 
Sex racket busted
 (Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील नरेंद्र नगर परिसरातील लोटस सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये (Service apartment) सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर नागपूर पोलिसांनी धाड टाकून एक आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, हे रॅकेट गेल्या काही दिवसांपासून गुपचूपपणे चालू असल्याचे उघड झाले आहे.
 
सामाजिक सुरक्षा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून सापळा रचला. यानंतर फ्लॅट नंबर ६४ वर छापा टाकण्यात आला. तेथे आरोपी संकेत टवले हा महिलांना पैशाचं आमिष दाखवून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघडकीस आलं.
 
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही महिला नागपूर येथीलच रहिवासी असून, त्यांना अल्पावधीत भरघोस कमाईचे आमिष दाखवून या गर्तेत ओढण्यात आलं होतं. आरोपीने संबंधित अपार्टमेंट एका महिन्यापूर्वीच भाड्याने घेतल्याचं समोर आलं आहे.
 
आता आरोपीला व दोन्ही महिलांना पुढील चौकशीसाठी बेलतरोडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
 
ऑपरेशन शक्ती अंतर्गत पोलिसांकडून अशा अनैतिक धंद्यांवर धडक कारवाया सुरू असून, शहरातील गुन्हेगारीच्या टोळक्यांना चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.