मुख्यमंत्र्यांकडून फुके यांच्या वक्तव्याची पाठराखण; माध्यमांनी चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप

04 Aug 2025 20:43:29
 
CM Fadnavis and Parinay Phuke
 (Image Source-Internet)
मुंबई :
भाजप आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या वादग्रस्त विधानावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले असून, त्यांनी फुके यांचे समर्थन केले आहे. फडणवीसांनी स्पष्ट केले की, फुके यांनी केलेले विधान चुकीच्या अर्थाने सादर करण्यात आले असून, त्यांनी कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा वापरलेली नाही.
 
फडणवीस म्हणाले, “परिणय फुके यांनी 'आईचं श्रेय आणि बापाची चूक' असं विधान केलं, तेव्हा त्यांनी उपरोधाच्या स्वरात विचारलं की ‘मी काय वडील आहे का?’ हे विधान त्यांनी शिवसेनेच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी केले होते. यामध्ये कोणताही शिवसेनेचा अपमान नाही.”
 
तसेच माध्यमांनी फुके यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत तो चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. “वक्तव्याचे संदर्भ तोडून मांडणे ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने संभ्रम निर्माण करणे थांबवले पाहिजे,” असे ते म्हणाले.
 
या संपूर्ण प्रकरणावरून शिंदे गट आक्रमक झालेला असून फुके यांनी माफी मागावी, अशी मागणी सुरू आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थनानंतर भाजपने फुके यांच्यापाठी ठामपणे उभे राहत हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0