धक्कादायक; नागपुरात भरदिवसा १६ वर्षीय मुलीची हत्या

    30-Aug-2025
Total Views |
 
Murder case
 (Image Source-Internet)
नागपूर :
अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलमोहर कॉलनीत आज दुपारी धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला करून तिचा जागीच खून केला. दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी अजनीतील सेंट अँथोनी स्कूलमध्ये शिकत होती. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना आरोपीने तिला फोन करून बोलावलं. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर संतापाच्या भरात आरोपीने चाकू बाहेर काढत सलग वार केले.
 
हल्ला एवढा गंभीर होता की मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
 
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चक्रं वेगाने फिरू लागली आहेत. दरम्यान, गुलमोहर कॉलनी परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे.