(Image Source-Internet)
नागपूर :
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी अलीकडेच आपली जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यानंतर शुक्रवारी तिवारी यांनी आपल्या नव्या टीमसह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Gadkari) यांची भेट घेतली. या वेळी गडकरींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन केले.
तिवारी यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष, १६ मंत्री आणि ४ महामंत्री यांचा समावेश आहे. यामध्ये एका महिला महामंत्र्याचाही सहभाग आहे. नव्या टीममध्ये जुन्या-नव्या चेहऱ्यांना स्थान देत जातीय समतोल साधण्यावरही भर देण्यात आला आहे.
नवी कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत केंद्रीय मंत्र्यांनी पक्षसंघटनाला अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच नव्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आगामी निवडणुकीत भाजपा आणखी मजबुतीने उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.