‘परम सुंदरी’साठी अभिनेता सिद्धार्थ-अभिनेत्री जान्हवीने घेतली कोटींची फी; इतर कलाकारांचं मानधनही चर्चेत

29 Aug 2025 21:20:22
 
Param Sundari
 (Image Source-Internet)
मुंबई :
सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘परम सुंदरी’ चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रेलर, टीझर आणि गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित हा चित्रपट 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, परम आणि सुंदरी या दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखांची प्रेमकथा यात उलगडली जाणार आहे.
 
कलाकारांची फी-
मिळालेल्या माहितीनुसार,
सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटासाठी तब्बल 10 ते 12 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
जान्हवी कपूरला सुंदरीच्या भूमिकेसाठी 4 ते 5 कोटी रुपये मिळाले आहेत.
संजय कपूरने साकारलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्याला 50 लाख रुपये मिळाले.
मनजोत सिंहला सहाय्यक भूमिकेसाठी 25 लाख रुपये, तर रेन्जी पणिक्करलाही 25 ते 30 लाख रुपये फी दिल्याचं समजतं.
निर्मिती व बजेट-
‘स्त्री 2’ आणि ‘छावा’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मॅडॉक स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली असून, यासाठी जवळपास 45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
 
प्रेक्षकांचा प्रतिसाद-
‘पिंकविला’च्या अहवालानुसार, 27 ऑगस्ट रात्री 11 वाजेपर्यंत या चित्रपटाची 12 हजारांहून अधिक तिकिटं विकली गेली होती. एखाद्या रोमँटिक कॉमेडीसाठी ही जोरदार सुरुवात मानली जात आहे. ही बुकिंग 40 हजार तिकिटांपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीच 7 ते 8 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास दुसऱ्या दिवसापासून कमाईत चांगली उडी घेण्याची शक्यता आहे.
 
एकूणच ‘परम सुंदरी’ने रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर उत्सुकतेचं वातावरण तयार केलं आहे.
Powered By Sangraha 9.0