(Image Source-Internet)
नागपूर :
जिल्ह्यातील मौदा (Mouda) तालुक्यात बुधवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावरून घरी परतणाऱ्या तरुणावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाचं नाव सागर पंढरीची जुमाले (वय २७) असं सांगितलं जात आहे. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचं सावट पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर बुधवारी काम आटोपून नागपूरहून आपल्या धामणगाव गावाकडे निघाले होते. नागपूर-भंडारा मार्गावरील महलागाव-कढोली परिसरातून जात असताना अचानक वीज कोसळली आणि ते तिच्या चपेटेत आले. विजेच्या या धक्क्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची बातमी समजताच धामणगाव गावात शोककळा पसरली. अविवाहित असलेले सागर एनटीपीसीमध्ये संविदाकर्मी म्हणून कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) मौदा रुग्णालयात हलवण्यात आले.