बिग बॉस 19 मध्ये एंट्री घेताच चर्चेत आली 'ही' तरुण स्पर्धक; १९ व्या वर्षी कमावले कोट्यवधी!

28 Aug 2025 16:05:37
 
Tanya Mittal
 (Image Source-Internet)
मुंबई :
कलर्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) सुरू होताच घरातील एका तरुणीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्या काही दिवसांतच ती काही सदस्यांशी वाद घालताना दिसली आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या चर्चेत असलेली स्पर्धक म्हणजे तान्या मित्तल.
 
तान्या मित्तल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि उद्योजिका असून, तिच्या इंस्टाग्रामवर तब्बल २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असलेल्या तान्याने अगदी कमी वेळात लोकप्रियतेच्या शिखरावर मजल मारली आहे.
 
तिच्याकडे केवळ प्रसिद्धीच नाही, तर मोठी संपत्तीही आहे. वयाच्या १९ व्या वर्षीच तब्बल २ कोटी रुपयांची मालकीण म्हणून तान्या ओळखली जाते. ‘Handmade With Love By Tanya’ या स्वतःच्या ब्रँडद्वारे ती हँडबॅग्स आणि साड्यांचा व्यवसाय करते.
 
बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर तान्या मित्तलचे व्यक्तिमत्त्व, तिचा व्यवसाय आणि तिची श्रीमंती हे चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. कमी वयात मिळवलेली ही कीर्ती आणि यश पाहता, ती शोमध्ये किती पुढे जाते याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.
Powered By Sangraha 9.0