भारताची झेप; अमेरिकेला मागे टाकून होऊ शकतो जगातील दुसरा सर्वात मोठा आर्थिक शक्ती केंद्र!

28 Aug 2025 20:09:36
 
largest economic powerhouse
(Image Source-Internet)  
नवी दिल्ली :
भारतीय (India) अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग पाहता देश पुढील काही वर्षांत अमेरिकेलाही मागे टाकू शकतो, असं नवं चित्र समोर आलं आहे. ईवाय (EY) इकॉनॉमी वॉचच्या ताज्या अहवालानुसार, भारत २०३० पर्यंत तब्बल २० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था गाठू शकतो, तर २०३८ पर्यंत तो ३४ ट्रिलियन डॉलर्सवर झेपावत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आर्थिक महासत्ता देश बनेल.
 
जागतिक मंदी, व्यापारातील ताणतणाव आणि इतर आव्हानं असतानाही देशातील प्रबळ घरगुती मागणी, तंत्रज्ञानाचा वेगाने होत असलेला विकास आणि स्थिर आर्थिक धोरणं यामुळे भारताची गाडी पुढे सरकत आहे. सध्या पाचव्या स्थानावर असलेला भारत, चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर झेपावण्याच्या मार्गावर आहे.
 
तज्ज्ञांचे मत आहे की, सध्याचा विकासदर कायम राहिला, तर पुढील दोन दशकांत भारताचे स्थान जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर अभूतपूर्व उंचीवर पोहोचेल.
Powered By Sangraha 9.0