अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणवर गुन्हा दाखल; राजस्थानात न्यायालयाचा आदेश

    28-Aug-2025
Total Views |
- कार प्रकरणामुळे अडचणीत स्टार्स

Shah Rukh Khan and Deepika Padukone(Image Source-Internet)  
भरतपूर :
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राजस्थानातील भरतपूर येथे न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी दोघांविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. Hyundai Alcazar 1.5 Signature कार प्रकरणामुळे त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
 
प्रकरणाची सुरुवात कशी झाली?
भरतपूरमधील वकील कीर्ती सिंह यांनी 2022 मध्ये सुमारे 23.97 लाख रुपये किंमतीची कार खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसकडून कर्ज घेतले आणि अर्धी रक्कम रोखीने भरली होती. मात्र, काही काळातच गाडीत तांत्रिक दोष आढळल्याचे सांगण्यात आले.
 
तक्रारदाराने कंपनी आणि डीलरला याबाबत कळवले. पण वाहन बदलून देणे किंवा पैसे परत करण्याची मागणी फेटाळण्यात आली. यामुळेच त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
 
नेमके आरोप काय?
तक्रारीत म्हटले आहे की कंपनीने दोषपूर्ण वाहन बाजारात आणून ग्राहकांची दिशाभूल केली. या प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतच, कारचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेले शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावरही खोट्या जाहिराती व ग्राहकांना फसवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 
न्यायालयाचा आदेश आणि पुढील तपास-
न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
 
सेलिब्रिटींवर कायदेशीर वादाचे सावट-
‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ सारख्या सुपरहिट चित्रपटांत झळकलेले शाहरुख-दीपिका हे हायप्रोफाईल स्टार्स आता एका गुंतागुंतीच्या कायदेशीर लढाईत अडकले आहेत. या प्रकरणाचा निकाल काय लागतो, याकडे देशभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे.