(Image Source-Internet)
लखनौ :
चार दशकांनंतर एका भारतीयाला अंतराळ प्रवासाची संधी मिळाल्याने देशभरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. लखनौचे सुपुत्र ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (Shubanshu Shukla) यांनी हा यशस्वी प्रवास पूर्ण करून पहिल्यांदा आपल्या मायभूमीत आगमन केले. त्यांच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित राहून त्यांना विशेष सन्मान दिला तसेच स्पेस टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभांशू शुक्ला यांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली.
या कार्यक्रमात ब्रजेश पाठक यांनी शुभांशूंच्या आई आशा शुक्ला यांचा, केशव प्रसाद मौर्य यांनी वडील शंभू दयाल शुक्ला यांचा आणि महापौर सुषमा खरकवाल यांनी कामना शुक्ला यांचा गौरव केला. मुख्यमंत्री यांनी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन शुक्ला यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या अंतराळ मोहिमेवर आधारित लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “काही वर्षांपूर्वी राज्यातील कोणत्याही विद्यापीठात स्पेस टेक्नॉलॉजीशी संबंधित शिक्षण नव्हते. मात्र आज अनेक तांत्रिक संस्थांमध्ये यासंबंधी अभ्यासक्रम सुरू आहेत. पंतप्रधान **नरेंद्र मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यात या क्षेत्राचा मोठा वाटा असेल.”
शुभांशू शुक्ला यांनी १८ दिवस चाललेल्या मोहिमेत ३२० वेळा पृथ्वीची परिक्रमा केली. या प्रवासाने त्यांना मिळालेले अनुभव आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदल आणि कृषी संकट यावर उपाय शोधण्यासाठी उपयोगी ठरतील, असेही त्यांनी नमूद केले. अंतराळातील जीवनाविषयी सांगताना त्यांनी मायक्रोग्रॅव्हिटीमुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.
तरुणांना प्रेरणा देत शुक्ला म्हणाले, “२०४० पर्यंत एखादा भारतीय युवक-युवती नक्कीच चंद्रावर पाऊल ठेवेल. त्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मी देखील प्रयत्नशील असेन.