(Image Source-Internet)
नागपूर:
सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून आर्थिक व्यवहारांमध्ये (Financial transactions) काही महत्त्वाचे बदल लागू होत आहेत, जे घरगुती बजेटवर थेट परिणाम करू शकतात. चांदी खरेदी-विक्रीत पारदर्शकता, SBI क्रेडिट कार्डचे शुल्क, एलपीजी दर, ATM व्यवहार नियम आणि FD व्याजदरांमध्ये बदल या सगळ्याचा समावेश आहे.
1. चांदी खरेदीत अधिक पारदर्शकता-
सरकार चांदीच्या व्यवहारात हॉलमार्किंग वाढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे गुणवत्तेची खात्री सोपी होईल, पण काही प्रमाणात किंमती वाढू शकतात. दागिने किंवा गुंतवणूक-ग्रेड चांदी खरेदी करताना प्रमाणपत्र, शुद्धता आणि बिल नीट तपासणे गरजेचे आहे.
2. SBI क्रेडिट कार्डचे नवे शुल्क-
1 सप्टेंबरपासून SBI कार्डधारकांसाठी शुल्क रचनेत बदल येऊ शकतो. बिल पेमेंट, इंधन खरेदी, ऑनलाइन शॉपिंगवर शुल्क वाढ, ऑटो-डेबिट फेल झाल्यास 2% दंड आणि रिवॉर्ड पॉइंट्समध्ये कपात यांचा समावेश होऊ शकतो. स्टेटमेंट-डेट्स लक्षात ठेवून पेमेंट करणे आणि कार्डच्या नियमांची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
3. एलपीजी सिलेंडर दरातील बदल-
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमती बदलतात. जागतिक क्रूड आणि तेल कंपन्यांच्या निर्णयांनुसार दर चढ-उतार होतात, त्यामुळे मासिक बजेटमध्ये थोडा बफर ठेवणे फायदेशीर ठरेल.
4. ATM व्यवहार नियम-
काही बँकांच्या ATM नियमांमध्ये बदल अपेक्षित आहेत. मोफत व्यवहार मर्यादेपलीकडे गेल्यास अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते. त्यामुळे छोटे व्यवहार टाळून UPI किंवा नेटबँकिंगसारखे डिजिटल पर्याय वापरणे सोयीस्कर राहील.
5. FD व्याजदर आणि गुंतवणूक-
सध्या FD व्याजदर 6.5%–7.5% दरम्यान आहेत. कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘FD लॅडरिंग’चा पर्याय वापरल्यास रिस्क कमी करता येतो. दीर्घकालीन रकमेचा काही भाग आताच लॉक करून, उरलेला टप्प्याटप्प्याने गुंतवणे योग्य ठरेल.