आम्ही धर्माला नाही, कृत्यांना शिक्षा केली;ऑपरेशन सिंदूर संदर्भात राजनाथ सिंहांचे वक्तव्य

25 Aug 2025 17:17:37
 
Rajnath Singh
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली:
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सोमवारी पाहलगाव दहशतवादी हल्ल्याबाबत महत्त्वाचे विधान केले. एप्रिलमध्ये झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांची हत्या केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना सिंह म्हणाले, “आपल्या सैनिकांनी दहशतवाद्यांचा धर्म पाहून नाही, तर त्यांच्या कृत्यांना शिक्षा दिली.” पाहलगाव हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करत पाकिस्तान आणि पाकिस्तान ताब्यातील काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर जोरदार कारवाई केली.
 
जोधपूर येथे आयोजित कार्यक्रमात सिंह म्हणाले की, भारत “वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवतो आणि जात किंवा धर्म यावर आधारित भेदभाव करत नाही. भारत आपल्या सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान करतो आणि शांतता तसेच आत्मसंरक्षणाच्या धोरणाशी कायम बांधिल आहे, असेही सिंह यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0