अभिनेत्री परीणीती चोप्रा–राघव लवकरच आई- बाबा होणार; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

25 Aug 2025 14:30:08
 
Parineeti Chopra
(Image Source-Internet) 
मुंबई :
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री परीणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच हे दाम्पत्य आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे.
 
२५ ऑगस्ट रोजी या दोघांनी एकत्रित व्हिडिओ पोस्ट करत हातात हात घालून चालतानाचा खास क्षण चाहत्यांशी शेअर केला. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलं "Our little universe on its way. Blessed beyond measure.”
 
View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

" /> 
 
लग्नानंतर काही महिन्यांतच परीणीती आणि राघव यांनी दिलेल्या या खुशखबरमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव त्यांच्या पोस्टवर होत असून, चाहते आता ‘चोटू चड्ढा’च्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Powered By Sangraha 9.0