(Image Source-Internet)
नागपूर :
शनिवारी नागपूरच्या रस्त्यांवर पारंपरिक पीळी मारबतची (Marbat) मिरवणूक धडाक्यात निघणार असून, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी मिरवणुकीचा मार्ग प्रत्यक्ष पाहून सुरक्षा आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.
मिरवणूक सुरळीत, शिस्तबद्ध व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. शहरातील संवेदनशील चौक, गल्ली आणि प्रमुख मार्गांवर पोलीस तैनात राहतील.
एकूण 3000 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ऐतिहासिक सोहळ्यात ड्युटीवर असणार आहेत. नागरिकांनी उत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करावा, यासाठी पोलिस दल सतत गस्त घालणार आहे.