(Image Source-Internet)
दिल्लीमध्ये (Delhi) शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. कालच ५० शाळांना ईमेल आणि फोनद्वारे धमकी दिल्यानंतर आज पुन्हा सहा शाळांना अशाच स्वरूपाची धमकी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, द्वारका सेक्टर ५मधील बीजीएस आंतरराष्ट्रीय सार्वजनिक शाळेसह आणखी पाच शाळांना आज सकाळी बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर तातडीने दिल्ली पोलिस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. शाळांच्या बाहेर पोलीस तैनात करून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
याआधी २० ऑगस्ट रोजी तब्बल ५० शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. सतत होत असलेल्या या धमक्यांमुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांनी यामागील सूत्रधार शोधण्यासाठी तपास अधिक गतीने सुरू केला आहे.