(Image Source-Internet)
कल्याण-डोंबिवली :
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Thackeray) गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटातील माजी नगरसेवक, सरपंच, तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
शिंदे यांनी या प्रसंगी स्वागत करताना सांगितले, “हे पदाधिकारी अनेक वर्षांपासून माझ्यासोबत कौटुंबिक नात्याने जोडले गेले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे आज ते स्वगृही परतले आहेत. त्यांच्यावाचून मलाही करमत नव्हतं.”
विकासावर भर –
“विकास आणि सर्वसामान्यांच्या जीवनमान उंचावणे हा महायुतीचा खरा अजेंडा आहे. शासनाच्या योजनांमुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हीच आमची दिशा आहे. त्यामुळेच हे सर्व पदाधिकारी विश्वासाने आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्या भागातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शासन मागे हटणार नाही. मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे शिंदे म्हणाले.
‘शब्द दिला की पाळतो’-
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मी जेव्हा शब्द देतो, तो खरा करतो हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिवसेनेच्या बळावर लोकसभा, विधानसभा आम्ही जिंकली. आता स्थानिक स्वराज्य संस्थाही महायुती मोठ्या फरकाने जिंकेल,” असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार-
यावेळी शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर निशाणा साधत म्हटले, “पुढे कोण जाणार हे जनता ठरवते. महाराष्ट्रातील जनता काम करणाऱ्यांना पुढे नेईल, पण घरी बसणाऱ्यांना घरी बसवेल. महाविकास आघाडी स्थगिती सरकार होतं, आम्ही तेथील अडथळे दूर करून समृद्धी सरकार आणलं.