महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक; सुमारे २५,८९२ रोजगार संधी

20 Aug 2025 21:21:17
 
Maharashtra employment opportunities
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यात डेटा सेंटर आणि सौर ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने १० सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांमुळे ४२,८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून जवळपास २५,८९२ रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
 
मंत्रालयात झालेल्या या करार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आठ गुंतवणूक करारांसोबत दोन धोरणात्मक करारही करण्यात आले. यामुळे महाराष्ट्र डेटा सेंटर आणि हरित ऊर्जेच्या क्षेत्रात महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे सांगितले गेले.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, गुंतवणूकदारांचा विश्वास मोठा असून शासन त्यांना आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य करेल. याचबरोबर आयआयटी मुंबई व आयआयटी मद्रास यांच्या सहकार्याने हायपरलूप प्रकल्पालाही वेग मिळत आहे. या प्रकल्पामुळे राज्यात वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठा बदल घडेल.
 
नव्या करारांमुळे उद्योग, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित असून महाराष्ट्रातील रोजगाराच्या संधींना मोठा हातभार लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0