नागपूरमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रशासनाची विशेष बैठक

    13-Aug-2025
Total Views |
 
Ganeshotsav
 (Image Source-Internet)
नागपूर:
नागपूरमध्ये 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) प्रारंभ होत असून, यंदाचा उत्सव प्रदूषणमुक्त आणि सामाजिक जबाबदारीने पार पडावा यासाठी महापालिका आणि पोलिस विभागाने विशेष बैठक घेतली. मंगळवारी राजवाड्यातील सुरेश भट सभागृहात गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यात आले.
 
बैठकीत महापालिका आयुक्त अभिजित चौधरी आणि पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक सौहार्द आणि पर्यावरण संवर्धनाची संधी असल्याचे सांगितले. मंडळांनी सण साजरा करताना प्रदूषणावर नियंत्रण, विसर्जन व्यवस्थापन आणि आवाज नियंत्रणाची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
या प्रसंगी सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त शिवाजी राठोड, वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त निकेत कदम, उपायुक्त शशिकांत सातव आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.
 
प्रशासनाकडून मिरवणुकीदरम्यान डीजेचा आवाज मर्यादित ठेवणे, अश्लील गाणी वाजवणे टाळणे, आवश्यक परवानग्या घेणे, विसर्जनाची पूर्वसूचना पोलिसांना देणे आणि जनजागृती मोहिमा राबवण्याचे आवाहन करण्यात आले.