(Image Source-Internet)
नवी दिल्ली:
अमेरिकेने भारतावर टॅरिफ (Tariff) लावल्याने दोन्ही देशांतील मतभेद तीव्र झाले आहेत. या पावलाने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असला, तरी अनेक देशांनी उघडपणे भारताच्या भूमिकेचा समर्थन केला आहे. माजी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतावर टीका करत कठोर वक्तव्ये केली असून, पाकिस्तानचा मुद्दा पुढे करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत आता सिंगापूरसोबत 10 महत्त्वाचे करार करण्याच्या तयारीत आहे. आगामी आठवड्यात होणाऱ्या मंत्रीस्तरीय बैठकीत कनेक्टिव्हिटी, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रांसह विविध विषयांवर करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. हे करार दोन्ही देशांना सहकार्याची नवी दिशा देतील आणि अमेरिकेसाठीही हा एक ठोस संदेश ठरेल.
महत्त्वाचे म्हणजे, भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पुरवण्यासाठी समुद्राखालून केबल टाकण्याच्या प्रकल्पावर काम सुरू असून, अंतिम टप्प्यात डेटा संकलन सुरू आहे. याशिवाय, ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजन निर्यात करण्याचे करारात प्रस्तावित आहे. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग पुढील महिन्यात भारत दौर्यावर येणार असून, त्याआधीच हे करार पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाला भारताने स्पष्ट विरोध दर्शवला असून, रशियाकडून कच्चे तेल खरेदी चालू ठेवणे हीच अमेरिकेला सर्वाधिक खटकणारी बाब मानली जाते.