अंगारकी संकष्टी निमित्त टेकडी गणेश मंदिरात भक्तांचा मोठा उत्साह

    12-Aug-2025
Total Views |
 
Tekdi Ganesh temple
 (Image Source-Internet)
नागपूर :
पूर्वाभाद्रपद नक्षत्रावर आलेली अंगारकी संकष्टी चतुर्थी आज नागपूरकरांसाठी धार्मिक उत्साहाने साजरी होत आहे. पहाटेपासूनच शहरातील भाविकांनी टेकडी गणेश मंदिरात (Tekdi Ganesh temple) दर्शनासाठी मोठी रांग लावली. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व असते, मात्र मंगळवारी येणारी ही चतुर्थी ‘अंगारकी’ म्हणून ओळखली जाते.
 
धार्मिक श्रद्धेनुसार ‘अंगारक’ हे मंगळ ग्रहाचे नाव असून, या दिवशी गणेशपूजेसह मंगळाचीही कृपा मिळते. मान्यता अशी की, या दिवशी व्रत-पूजा केल्यास वर्षभरातील सर्व संकष्टींचे पुण्य प्राप्त होते, संकटे दूर होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
 
अनेक भक्तांच्या मते, फक्त एका अंगारकी संकष्टीचे व्रत केल्यानेच संपूर्ण वर्षभराच्या व्रताइतके फल मिळते. या श्रद्धेने आज दिवसभर टेकडी मंदिर परिसरात भक्ति-भावनेचे वातावरण आहे. सकाळपासूनच गणेश दर्शन, नैवेद्य अर्पण आणि प्रार्थनेत भाविकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.