(Image Source-Internet)
मुंबई :
मंगळवार, ८ जुलै रोजी सोन्या (Gold) -चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ५९९ रुपयांनी वाढून ९७,१९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून, जीएसटीसह याची किंमत १,००,११० रुपये झाली आहे. चांदीतही १,१५९ रुपयांची मोठी उसळी नोंदवली असून ती १,१०,९२० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
२३ कॅरेट सोनं ५९७ रुपयांनी महाग होऊन ९६,८०६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं असून, जीएसटीसह त्याची किंमत ९९,७१० रुपये झाली आहे. २२ कॅरेट सोनं ५०० रुपयांनी वाढून ८८,९८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर विकले जात आहे, जीएसटीसह याची किंमत ९१,६५१ रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत ४१० रुपयांनी वाढून ७२,८५७ रुपये झाली असून, जीएसटीसह ती ७५,०४२ रुपये झाली आहे. १४ कॅरेट सोनं ५६,८२८ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात असून, जीएसटीनंतर त्याची किंमत ५८,५३२ रुपये झाली आहे.
हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे निश्चित केले जात असून, शहरानुसार या किमतीत १,००० ते २,००० रुपयांचा फरक असू शकतो. दररोज दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ वाजता हे दर जाहीर केले जातात.