केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; DA मध्ये 4% वाढ होण्याची शक्यता

    05-Jul-2025
Total Views |
 
DA
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात (DA) चार टक्क्यांची वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या 55 टक्के असलेला DA वाढून 59 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळातील अंतिम वाढ ठरू शकते.
 
महागाई निर्देशांकावर आधारित निर्णय-
महागाई भत्ता निश्चित करताना AICPI-IW म्हणजेच औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक हा महत्त्वाचा मानदंड असतो. मे 2025 मध्ये हा निर्देशांक 0.5 ने वाढून 144 वर पोहोचला. मार्चमध्ये तो 143, एप्रिलमध्ये 143.5 होता. जर हा निर्देशांक पुढील काही महिन्यांत 144.5 पर्यंत गेला, तर 12 महिन्यांची सरासरी 144.17 होण्याची शक्यता आहे – यामुळेच DA मध्ये 4% वाढ अपेक्षित आहे.
 
DA वाढीचा पगारावर थेट परिणाम- 
DA वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर थेट परिणाम होणार आहे. उदाहरणार्थ:
 
18,000 रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला सध्या 55% प्रमाणे 9900 रुपये DA मिळतो, जो 59% झाला तर 10,620 रुपये मिळतील – म्हणजेच दरमहा 720 रुपयांची वाढ.
 
50,000 रुपयांच्या पगारावर DA सध्या 27,500 रुपये आहे, तो वाढून 29,500 रुपये होऊ शकतो.
 
कौन लाभार्थी?
ही वाढ केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना, निवृत्त कर्मचार्‍यांना आणि विविध केंद्रीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना लागू होईल. यामुळे मासिक उत्पन्नात वाढ होणार असून, महागाईशी सामना करणे सुलभ होईल. यासोबतच, पीएफ आणि ग्रॅच्युटीच्या गणनेत देखील वाढ होईल.
 
शेवटची वाढ ठरण्याची शक्यता-
गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत केंद्र सरकारने DA वाढीची घोषणा केली होती. यंदाही त्याच कालावधीत निर्णय अपेक्षित आहे. लक्षणीय बाब म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर 2025 ला समाप्त होतो, त्यामुळे ही वाढ शेवटची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.