मालेगाव स्फोट प्रकरण; काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी, फडणवीसांची प्रतिक्रिया

31 Jul 2025 15:48:57
 
CM Fadnavis reaction
 (Image Source-Internet)
मुंबई :
2008 मधील बहुचर्चित मालेगाव (Malegaon) बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर सहा आरोपींना निर्दोष ठरवले. पुराव्यांअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता केली.
 
सरकारी पक्षाने स्फोट झाल्याचे सिद्ध केले, मात्र बॉम्ब कोणत्या वाहनात ठेवण्यात आला याबाबत ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. तसेच, काही जखमींच्या वैद्यकीय अहवालांमध्ये फेरफार झाल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना क्लीन चिट दिली.
 
या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करत स्पष्टपणे सांगितले की, "भगवा दहशतवाद" हा शब्दच खोटा होता आणि तो केवळ राजकीय द्वेषातून तयार करण्यात आला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यासाठी काँग्रेसने जबाबदारी घेत संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी.
 
फडणवीस यांच्या या ठाम भूमिकेने राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, हा निकाल राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नव्या उंचीवर नेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0