(Image Source-Internet)
मुंबई:
आजच्या सराफा बाजारात सोन्या (Gold) -चांदीच्या किमतीत लक्षणीय घसरण झाल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये हलकासा उत्साह निर्माण झाला आहे. सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ६०३ रुपयांनी कमी होऊन ९८,४१४ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीमध्ये तब्बल १६५५ रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, तिचा दर आता १११,७४५ रुपये प्रति किलोवर आला आहे.
जीएसटीसह २४ कॅरेट सोनं सराफा बाजारात १० ग्रॅमसाठी १,०१३६६ रुपयांना विकले जात आहे, तर चांदी ११५०९७ रुपये प्रति किलो दराने विक्रीस उपलब्ध आहे. यामध्ये मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत.
गेल्या काही दिवसांतील उच्चांकाशी तुलना केली असता, सोन्याचा भाव १००५३३ रुपयांवरून घसरून ९८४१४ रुपयांवर आला असून, यामध्ये २११९ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीनेही २३ जुलै २०२५ रोजी गाठलेला ११५८५० रुपयांचा उच्चांक गमावला असून, ती आता ४१०५ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
२३ कॅरेट सोन्याचाही दर आज ६०० रुपयांनी घसरून ९८,०२० रुपयांवर आला आहे. जीएसटीसह हा दर सध्या १,००९६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. २२ कॅरेट सोनं ५५३ रुपयांनी स्वस्त होऊन ९०,१४७ रुपयांवर आले असून, त्याचा दर आता जीएसटीसह ९२८५१ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत ७३,८११ रुपये असून, करानंतर ती ७६,०२५ रुपयांपर्यंत जाते. तर १४ कॅरेट सोनं आता जीएसटीसह ५९,३१९ रुपयांना विकले जात आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने आजचे स्पॉट दर जाहीर केले असून, तुमच्या शहरातील स्थानिक दरात १००० ते २००० रुपयांपर्यंत फरक पडू शकतो. IBJA दररोज दोन वेळा – दुपारी १२ आणि संध्याकाळी ५ च्या सुमारास दर प्रसिद्ध करते.
सोनं-चांदी खरेदी करण्याची योजना आखत असाल, तर आजचा घसरणीचा दिवस तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकतो.