शिर्डी ते तिरुपती थेट रेल्वेसेवा; भक्तांसाठी रेल्वे विभागाचा खास निर्णय,१८ विशेष गाड्यांची घोषणा

31 Jul 2025 16:01:49
 
Shirdi to Tirupati
 (Image Source-Internet)
नवी दिल्ली :
देशातील दोन प्रमुख श्रद्धास्थळं – शिर्डी (Shirdi) आणि तिरुपती – आता थेट रेल्वे मार्गाने जोडली जाणार असून, भाविकांसाठी ही एक सुखद बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने शिर्डी आणि तिरुपती दरम्यान १८ विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेचा प्रारंभ ४ ऑगस्ट २०२५ पासून होणार असून २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत ही गाडी दर आठवड्याला धावणार आहे.
 
गाड्यांची वेळापत्रक व माहिती -
ट्रेन क्र. 07638 (शिर्डी – तिरुपती):
दर सोमवारी सायंकाळी ७:३५ वाजता साईनगर शिर्डीहून सुटणार. आणि तिसऱ्या दिवशी पहाटे १:३० वाजता तिरुपतीत पोहोचणार.
 
ट्रेन क्र. 07637 (तिरुपती – शिर्डी):
ही गाडी दर रविवारी पहाटे ४:०० वाजता तिरुपतीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४५ वाजता शिर्डीला पोहोचेल.
 
प्रमुख थांबे -
या विशेष गाड्या कोपरगाव, मनमाड, नागरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर रोड, बीदर, सिकंदराबाद, नलगोंडा, तेनाली, गुडूर, रेणिगुंटा इत्यादी स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील प्रवाशांसाठी या सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
 
कोच संरचना -
२ वातानुकूलित दुसऱ्या श्रेणीचे (AC 2-tier) डबे
४ वातानुकूलित तिसऱ्या श्रेणीचे (AC 3-tier) डबे
६ शयनयान डबे (Sleeper)
४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे
१ ब्रेक व गार्ड व्हॅन
१ जनरेटर व्हॅन
प्रत्येक प्रवाशाच्या गरजेनुसार डब्यांची रचना करण्यात आली आहे.
 
आरक्षण आणि तिकिट बुकिंग -
गाडी क्रमांक 07638 साठी आरक्षण १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या ऑनलाइन पोर्टलवर बुकिंग करता येईल. अनारक्षित डब्यांसाठी UTS मोबाईल अ‍ॅप व तिकीट खिडकी उपलब्ध असणार आहे. दर साधारण Superfast Express गाड्यांप्रमाणेच असणार आहे.
 
दरम्यान रेल्वे विभागाच्या या उपक्रमामुळे शिर्डी व तिरुपती या दोन श्रद्धास्थळांमधील अंतर आता भक्तांसाठी अधिक सुलभ, थेट आणि वेळेची बचत करणारे ठरणार आहे. साईबाबा आणि श्री वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनाची आस असलेल्यांसाठी ही रेल्वे सेवा एक वरदान ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0