जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; दोन दहशतवादी ठार

30 Jul 2025 16:32:41
 
Jammu and Kashmir
 (Image Source-Internet)
पूंछ :
जम्मू-काश्मीरच्या पूंछ (Poonch) जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम राबवत लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी सकाळी ही चकमक झाली.
 
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सीमेलगतच्या भागात घुसखोरीचा प्रयत्न होणार असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने चकमक उडाली. या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले.
 
सुरक्षा दलांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा हस्तगत केला आहे. मृत दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न होते आणि ते सीमेपलीकडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
दहशतवाद्यांविरोधातील लढाईत सुरक्षा यंत्रणांना मिळालेलं हे आणखी एक मोठं यश मानलं जात आहे. या कारवाईमुळे सीमावर्ती भागात पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0