कन्हान नदीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; परिसरात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

30 Jul 2025 20:47:58
 
 Kanhan river
 (Image Source-Internet)
नागपूर :
कामठी छावणी परिसरातील गाडेघाट येथे कन्हान नदीत (Kanhan river) एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. नागरिकांनी मृतदेह पाहताच तात्काळ जुने कामठी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह नदीतून बाहेर काढला आणि तो पोस्टमार्टमसाठी कामठी उप-जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.
 
पावसामुळे रहदारी कमी, उशिरा लक्षात आली घटना
मंगळवारी दिवसभरात पावसामुळे परिसरात फारशी वर्दळ नव्हती. संध्याकाळी काही नागरिक नदीच्या काठावर गेले असता, त्यांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.
 
पोलीस तपास सुरु; ओळख पटवण्याचा प्रयत्न
पोलिसांनी घटनास्थळी हजर होत जवानांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. जुने कामठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हिंगणा परिसरातून एका व्यक्तीचा तपास सुरू आहे. त्यामुळे या मृतदेहाचा त्या गुमशुदा व्यक्तीशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.
 
दरम्यान, या मृत्यूचे नेमके कारण काय? अपघात, आत्महत्या की अन्य कोणता गुन्हा? याचा पोस्टमार्टमनंतर खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले. स्थानिक नागरिकांत यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
Powered By Sangraha 9.0