(Image Source-Internet)
नागपूर :
पिकनिकचा आनंद काही क्षणांतच शोकांतिकेत बदलला, अशी हृदयद्रावक घटना कामठी तालुक्यात घडली आहे. भीलगाव येथील पाच मित्र पिकनिकसाठी गेले असताना पियुष सुरज सुखदेवे (वय २० वर्षे, रा. भीलगाव) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना रविवारी (२६ जुलै) दुपारच्या सुमारास घडली. पाच मित्रांनी एकत्र येत पिकनिकचे आयोजन केले होते. जलाशयाजवळ सर्वजण पाण्यात उतरत असतानाच पियुषचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात गेला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र तोपर्यंत तो बुडाल्याचे सांगितले जाते.
मित्रांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. शोधमोहीम राबवण्यात आली असून काही वेळानंतर पियुषचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पियुषच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.