(Image Source-Internet)
मुंबई :
‘गली बॉय’ चित्रपटात ‘माया’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि मॉडेल श्रुती चौहान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता अहान पांडे (Ahan Pandey) आणि तिच्या नात्याबाबत अफवा पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
श्रुतीने अहानच्या डेब्यू चित्रपट ‘सैयारा’ च्या यशानंतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. तिने लिहिलं होतं,
“हे स्टेज तुझं आहे अहान, आय लव्ह यू आणि मला तुझा अभिमान आहे.”
या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये दोघं डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
मात्र, अहानच्या जवळच्या सूत्रांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, “ही पोस्ट फक्त अहानच्या यशाबद्दलची प्रशंसा होती, त्यात कोणताही रोमँटिक अर्थ नव्हता. दोघंही चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या नात्यात प्रेमाचा कोणताही संबंध नाही.”
श्रुती चौहान ही जयपूरच्या ज्योती विद्यापीठाची पदवीधर असून, अभिनय क्षेत्रात ती आपलं करिअर उभारत आहे. ‘गली बॉय’ मधील तिच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. सध्या ती तिच्या पुढील प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.
या चर्चांमुळे दोघांच्या वैयक्तिक नात्याला काहीसा गोंधळ निर्माण झाला असला तरी, आता दोघंही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत.